श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक पाचवा :मंत्रं-पारमार्थिकप्रगती

७. बद्ध ------------------- अज्ञानी ------- सुरुवात
[सांसारिक अज्ञानी]
८. मुमुक्षु [आत्मज्ञान प्राप्तिची इच्छा]---------àमध्यबिंदू-- पारमार्थिकप्रगती
९. साधक [आत्मज्ञानप्राप्त करण्याकरीता प्रयत्न]
१०. सिद्ध ------------------ज्ञानी -----------अंत

[आत्मज्ञान प्राप्त झाले,आता आत्मसाक्षात्कार व परब्रह्माबाबत संशय नाही.निर्गुण हेच त्याचे गुण]

दशक सहावा : देवशोधन-१

•आत्मसाक्षात्कार होऊन ब्रह्मात लीन होणे हेच आत्मज्ञान,हेच ब्रह्मज्ञान,हेच स्वरुपज्ञान होय.
•ब्रह्म निर्गुण,निराकार,निश्चळ आणि शाश्वत तर माया सगुण, सकार, चपळ आणि अशाश्वत. 
• जे अनुभवास येते ते सारे स्वानंद सागरातील बुडेबुडे आहेत अशा मिथ्यापणाच्या भावनेने चराचराकडे पाहणे म्हणजे व्यतिरेक होय.

दशक सहावा : देवशोधन-२

•मी’ पणामुळे आपण दृश्यविश्वाला चिकटतो, सूक्ष्म असे आत्मज्ञान साधण्यासाठी त्या सर्वस्वाचा सारासार विवेकाने  त्यागच करावा लागतो.

•परमात्मा प्राप्तिची अवस्था अवर्णनीय असल्याने त्यास अनिर्वाच्य म्हणूनच संबोधतात. 

दशक सहावा : देवशोधन-ब्रह्मनिरुपण

च्यारि सहस्त्र सातसे साठी- आतापर्यंत कलियुगाची ४७६० वर्षे झाली असे या ४थ्या समासातील ७व्या ओवीत म्हंटले आहे. या माहितीच्या आधारे श्रीमत् दासबोधाची रचना शके १५८१ साली पूर्ण झाली ही महत्वाची गोष्ट समजते.हे नमूद करण्यासाठी जाणीवपूर्वक याच समास, ओवी व दशक क्रमांकाची निवड करुन दासबोध रचनेचा शक विशेष संकेताने श्रीसमर्थांनी अधोरेखित केला आहे. ४था समास ७वी ओवी ६वा दशक म्हणजेच = स.ओ.द= ४.७.६० वर्षे झाली, हे सांगण्यासाठी याशिवाय इतर कुठल्याच दशक, समासाची निवड करता येणं शक्य नव्हतं,यावरुन संपूर्ण दासबोध याच वर्षी पूर्ण झाला असावा असं म्हणण्यास काहीच प्रत्यवाय नाही. केवळ हे नमूद करण्यासाठीच ब्रह्मनिरुपणाचा हा दशक व समास क्रमांक निवडला आहे. अन्यथा इतरत्रही अशी नोंद श्रीसमर्थांनी केलीच असती.

दशक सहावा :देवशोधन-अनुर्वाच्य

१. प्रापंचिक जबाबदारी सांभाळून विवेकाने या जन्माची सार्थकता होते.सतत चिंतन,मनन करुन या जन्मी नव्हेतर याक्षणी मुक्ती प्राप्त करुन घ्यावी असा उपदेश श्रीसमर्थ करतात.
२. अनुर्वाच्य- जोपर्यंत अहंभाव आहे तो प्रर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होत नाही.अहंभाव नाहीसा होणे हीच अनुभवाची खूण आहे. मीपणाच  नाहीसा झाला तर ब्रह्मस्वरुपाचं वर्णन कसं नि कोण बोलणार? म्हणून ब्रह्म हे ’अनिर्वाच्य’ होय.
३. ब्रह्म हे दृश्याहून भिन्न आहे,त्या ब्रह्माविषयी बोलणं तो  वाच्यांश, त्या बोलण्याचा अर्थ तो लक्ष्यांश,आणि तो लक्ष्यांश ही पूर्वपक्षच होय.म्हणून तो मिथ्या होय.

दशक सातवा : चतुर्दश ब्रह्म

• चौदा प्रकारचे ब्रह्म असते पण परब्रह्म ते वेगळेच असून अनुर्वाच्य आहे.ते पदार्थाच्या अंतर्बाह्य असे सर्वव्यापी आहे.
• ब्रह्म कधीही हा,ही,हे ह्याप्रकारें दाखवता येत नाही, गुणाशिवाय गौरव कसा करावा?
• ब्रह्माच्या निर्गुणत्वाचा निरास करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर माउलीनी ’सगुण निर्गुण गुणाचे अगुण’ अशी शब्दयोजना हरिपाठात केली.

दशक सातवा : चतुर्दश ब्रह्म

•परमार्थ साधना म्हणजे श्रवणàअर्थावर मनन à एकाग्रता अर्थात निदिध्यासनàआत्मसाक्षात्कार अर्थात (समाधान-मनःशांति)

• ज्याचा परब्रह्माशी तदाकार होतो तो भय,मृत्यु व प्रारब्धाच्या वर उठतो आणि जीवनमुक्त होतो.

दशक सातवा : चतुर्दश ब्रह्म

vमाया व ब्रह्म याची कल्पना मनाला होते. ती कल्पना मावळली अर्थात मन उन्मन झाले म्हणजे निर्विकल्प समाधी लागली की द्वैत उरतच नाही.कल्पनेनेच कल्पना मावळते.ब्रह्माची कल्पना ती शुद्ध,तोच संकल्प होय. मायेची कल्पना ती अशुद्ध, तो विकल्प होय.संकल्पाने विकल्पाचा नाश करुन केवळ ब्रह्माची प्राप्ती होते.

v ’बद्ध आणि मुक्त’ मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. साधु दिसायला वेगळे वेगळे दिसत असले तरी ते स्वस्वरुपात लीन झालेले परब्रह्मस्वरुपच असतात.

दशक आठवा : मायोद्‍भव

v व्यक्त सगुणाच्या आधाराने निर्गुण अव्यक्त परब्रह्म प्राप्त होते.
v परब्रह्मात अव्यक्त पंचमहाभूते व त्रिगुण यासह वायुरुप मूळमाया निर्माण झाली.
v मूळमायेच्या पोटी गुणमाया उत्पन्न झाली आणि ५ महाभूते व त्रिगुण व्यक्त  होऊन अष्टधा प्रकृती दृश्य विश्वरुपाने पसरली.
v शास्त्र,गुरु,आत्म या ३प्रचिती मधील समन्वय=आत्मनिवेदन.
v दृश्य आणि दृष्टा दोन्ही मिळाल्यावर सगळे द्वैत संपते.
v आपला खरा ’मी’ आणि परब्रह्म मूळात एकरुप आहे.

दशक आठवा : मायोद्‍भव

  आकाश                          आत्मा
१.घटाला व्यापून          १.पिंडाला व्यापून
   घटाकाश                    जीवात्मा
२.मठाला व्यापून        २.विश्वाला व्यापून
    मठाकाश                  शिवात्मा
             ३.मठाबाहेर               ३.विश्वाच्या बाहेर   परब्रह्म
    महदाकाश                परमात्मा 
४.उपाधीरहित           ४.उपाधीरहित परब्रह्म
    चिदाकाश                  निर्मळात्मा 

दशक नववा : गुणरुप

v प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आत्मज्ञान होत नाही.त्यासाठी ’मी’चा अर्थात अहंकाराचा नाश झाला पाहिजे.
v गुणामुळे माणसामध्ये भेद होतात.जो गुणसंपन्न तोच वैभवसंपन्न व भाग्यवान असतो.
v सगळे पंचमहाभूतांचे मिश्रण आहे, हे जाणले की पिंड आणि ब्रह्मांडातले साम्य उमजते.
v आधी सूक्ष्म प्रकट झाले व मग स्थूल विश्व निर्माण झाले.
v हेतुपूर्वक हालचाल म्हणजे जाणीव ती कोठे व्यक्त [स्थूल] तर कोठे अव्यक्त [सूक्ष्म].

दशक नववा : गुणरुप

v बुद्धिची कक्षा विशाल करुन पाहिल्यास सगळे स्पष्ट समजेल.
v अद्वैत परब्रह्माची कल्पना द्वैत देहबुद्धीवरून केली म्हणून
सगळा संशय निर्माण झाला.
v अद्वैत वेदांतानुसार पूर्ण विकसित ज्ञानी माणूस जीवन व मृत्युविषयक अशा सर्व प्रेरणांवर ताबा ठेऊं शकतो. तो सर्व बंधनापासून मुक्त असतो, अर्थात स्वतः ब्रह्मच असतो.
v अद्वैत वेदांतानुसार प्रत्येक व्यष्टीस ब्रह्मरुप होणे शक्य असते. कारण मुळातच तो ब्रह्म असतो, पण अज्ञानाने त्याला त्या चैतन्याब्रह्माची ओळख पटलेली नसते.


दशक नववा : गुणरुप

v मौनव्रत धारण केलेय असं मुखानं सांगताच मौन नाहीसें होतं तद्वत परब्रह्मानुभूती सांगू लागला तर तो अनुभव त्याला आला नाही असे समजावे कारण ते ’अनुर्वाच्य’ आहे.
v करुन कांहींच न करावे म्हणजे विवेकाने सर्व करुन निःसंग असावे,क्रियादोषविरहित क्रिया विवेकाने करावी आणि आपल्याच स्वरुपास विशेषत्वाने आपण पाहावे.
v असोन निशेष नसावे म्हणजे (विवेकाच्या जोरावर) मीपणाचा लवलेशही नसावा,तरी सर्व व्यवहार करीत असावे. विवेकबळें काहीच नसावे पण तरीही असावे.


दशक दहावा : जगज्जोति


v जगात एक सर्वशक्तिमान जाणीव कार्यरत असून 

तिचे रुप व प्रमाण देहामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने प्रकट 

होते.
परब्रह्मातल्या मूळमायेतील जाणीव
     
  सत्व,विष्णु       रज, ब्रह्मा       तम, रुद्र
  शुद्ध जाणीव     मिश्रित जाणीव  शुद्ध नेणीव
                 पालन                                                                   संहार
                                          विश्व निर्माण[सृष्टी रचना]

v पंचप्रलय: निद्रा,मृत्यु [पिंड], ब्रह्मनिद्रा,ब्रह्मांड आणि विवेक प्रलय    [ जग मिथ्या हे पटून आत्मसाक्षात्कार होऊन  परब्रह्माशी तदाकार]


दशक दहावा : जगज्जोति

निर्मळ परब्रह्म तेवढे सत्य आहे बाकीचे विश्व भ्रमरुप आहे.
भक्तांच्या श्रद्धा व भावनेमुळे संत त्यांना दर्शन देतात.
ही त्यांची [संताची] शिल्लक वासना नव्हे.
स्वानुभव घेतल्याशिवाय काहीसुद्धा फक्त अनुभवावर स्वीकार करु नये.
मूळ मायेचे स्वरुप

मूळमाया
वायु                        जाणीव
प्रकृती                     पुरुष
पंचभूते                                 त्रिगुण
सगळी खटपट सोडून अंतिम सत्य असलेल्या निश्चळ
  परब्रह्मास ओळखाल तर सर्व दुःखाचा निरास होईल.


दशक दहावा : जगज्जोति

vचैतन्यमयी आत्मा नित्य,अक्षय,अखंड, अविकारी, अद्वय असाच असतो.
v तो सर्व स्थितीत सदैव तेथेच असतो. तो चैतन्यमयी आत्मा ’स्थानत्रयव्यतिरिक्तत्वं, नित्यत्वं,शुद्धत्वं,बुद्धत्वं, मुक्तत्वं, अविक्रियत्वं, अपरिलुप्त-दृकस्वरुपत्वं,एकत्वं’ असा असतो - इति आत्मज्ञानोपदेशविधिः भाग ४ श्लोक १२ मध्ये म्हंटले आहे.
v कणभौतिकशास्त्रानेही आता प्रकाशकणांना जाणीव असते असं प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे.

उत्तरार्ध : व्यवहार

       दशक
दशक
११. भीमदशक
१६. सप्ततिन्वय
१२. विवेकवैराग्य
१७. प्रकृति-पुरुष.
१३. नामरुप.       
१८. बहुजिनसी
१४.अखंडध्यान
१९. शिकवण.
१५.आत्मदशक.  
 
२०. पूर्ण



दशक अकरावा : भीमदशक

vदृश्यात राहून निर्गुणाशी अनन्य=सहजसमाधी
v चत्वारदेव= प्रतिमा,अवतार,अंतरात्मा,परब्रह्म
v प्रपंच व परमार्थ यातील समतोलासाठी दिनक्रम पाळावा.
v आत्मसाक्षात्कारी महंताने लोकांचे अंतरंग ओळखून उत्तम  लोकांचा संग्रह करावा.
v महंताने केवळ संकेतानी/खाणाखुणांनी /मौनानी लोकांना आकर्षित करावे. भितीग्रस्तास धीर द्यावा.
v महंताने शुद्ध लिहावे,अशुद्ध शोधून शुद्ध करावे,शुद्ध वाचावे,याबाबत चुका करु नयेत. काही झाले तरी (महंताने) आपले महत्व कायम राखले पाहिजे.

दशक अकरावा : भीमदशक

v मूळमाया सूक्ष्माकडून स्थूलाकडे वाहणारी चंचळनदी आहे, त्यात प्रवाहाविरुद्ध पोहून जे उगमापावेतो पोचतात, त्यानाच परब्रह्म प्राप्त होते असे फार थोडे असतात. परब्रह्मा- पर्यंत पोचून त्यांनी मागे पाहिले तर ती चंचळनदीच नाहिशी झालेली असते, म्हणजेच ते वृत्तिशून्य होतात.
v या विश्वाला चालविणारा तोच अंतरात्मा होय.
v स्वानुभवाचा क्रम:-

शब्दानुभवàअर्थानुभव àअर्थवस्तुरुपानुभवàअनुभव घेण्याच्या वृत्तीचा लयàवृत्तीशून्य अवस्था (उन्मनी) [परब्रह्मात लीन] निर्विकल्प समाधी.


दशक बारावा : विवेक वैराग्य

प्रपंच आणि संसार यात श्रीसमर्थांनी पुष्कळवेळा भेद मानला आहे. हा भेद विचारांत न घेता, श्रीसमर्थ रामदासानी प्रपंचाची जी तरफदारी केली आहे तिचा उपयोग संसारी लोक स्वतःच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी करत असतात. संसारी लोकांनी हा भेद समजून घ्यावा, आणि प्रपंच नेटका करावा. जीवनाचे सार्थक करावे- इति स. भ. शंकर देव.

दशक बारावा : विवेक वैराग्य

v प्रपंच – मग तो व्यक्तिप्रपंच असो किंवा राष्ट्रप्रपंच असो- प्रपंच म्हणजे चरितार्थाचा व्यवसाय,जीवनाचे साधन.हा प्रपंच सोडून कोणाहि व्यक्तीचे किंवा राष्ट्राचे चालावयाचे नाही.। प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल॥ असं श्रीसमर्थांचे निक्षून सांगणे आहे.

v परंतु संसाराची गोष्ट तशी नाही. संसार म्हणजे बायकापोरांचा संसार. संसार म्हणजे आपलं घर, आपली शेतीवाडी, आपला पैसा, आपली जिवलग माणसं. हा संसार करा वा न करा,पण प्रपंच मात्र अवश्य कराच ! इति- स.भ.शंकर देव . 

दशक बारावा : विवेक वैराग्य

v प्रपंच करुन जो परमार्थ सांभाळतो तोच सर्वोत्तम पुरुष.
v विवेकाने व वैराग्यानेच प्रपंच व परमार्थाचा समतोल साधतो.
v विवेकी माणसाने(दीर्घसूचना) दूरदृष्टीने परिस्थितीचा (अखंड) निरंतर अंदाज घ्यावा.
v बिनचूक प्रयत्न नसतील तर यश लाभत नाही हे जाणावे.
v विवेकाने आपल्याला मरण आहे हे ध्यानात ठेऊन सर्वांशी चांगुलपणाने वागावे.

v प्रकृतिचा पसारा भ्रामक/मिथ्या आहे असा स्थिर निश्चय होणे म्हणजे विवेक,याने मीपणा सुटतो.

दशक बारावा : विवेक वैराग्य

v न जाणारे शाश्वत, ब्रह्म ते निश्चळ,माया ती चंचळ व जगत् ते जड होय. या तिघात ब्रह्म जाड होय.
v विषयत्यागाशिवाय ब्रह्म साधत नाही,वैराग्य मनात घडलं पाहिजे, विवेकाने संगत्याग आणि वैराग्याने वस्तुत्याग करावा.
v वैराग्य हे मोठे भाग्याचे लक्षण,यामुळे प्रपंच नेटका होतो.
v आत्मनिवेदनाच्या पायर्‍या चढून परब्रह्मात लीन व्हावे.
१.जड आत्मनिवेदन      :  प्रपंचाचा मालक परमात्मा,
२.चंचळ आत्मनिवेदन :  अंतरात्मा खरा कर्ता,
३.निश्चळआत्मनिवेदन   :   मायावी विश्व मिथ्या/भ्रामक,

                     निश्चळ परब्रह्म तेवढेच सत्य.

दशक बारावा :विवेक वैराग्य

काळ विलंबरुप आहे,माया पसरली म्हणून काळ दिसायला लागला,परब्रह्मस्थानी काळाला जागाच नाही.
काळ सगळ्यांनाच गिळणार. संसाराच्या बाजारात परब्रह्मरुपी नफा पाहून धन्य व्हावे.
प्रवृत्ती = सूक्ष्मà स्थूल = दुःख,
निवृत्ती = स्थूलà सूक्ष्म = सुख,
vकितीही वाईट माणूस असला तरी भगवंतास

शरण गेला तर त्याचा उद्धार होईल.[वाल्मिकी]
vजो स्वतः उत्तम गुण शिकून आत्मज्ञानी होतो,
   मग दुसर्‍याला शिकवतो तो उत्तम पुरुष.


दशक बारावा :विवेक वैराग्य

उन्मेष=स्फुरण,स्फूर्ती ही परा वाचा, ध्वनि पश्यंति वाचा, नाद मध्यमा तर शब्द ही वैखरी वाणी होय.
बावन मातृका- ॐ पैकी अ,उ,म या तीन मात्रा व वरील बिंदू ही अर्धमात्रा अशा साडेतीन मात्रा व यापासून नंतर ५२
मात्रा. अ,आ,इ,ई, उ,ऊ,ए,ऐ,ओ, औ,अं,अःऋ,ॠ,लृ,लॄ असे१६ स्वर,आणि क्,ख्,ग्,घ्,ड्‍.; च्,छ्‍,ज्,झ्,ञ्; ट्‍,ठ्‍,ड्‍,ढ्‍,ण्; त्,थ्,द्‍,ध्,न् प्,फ्,ब्,भ्,म्; य्,र्,ल्,व्,श्,ष्,स्,ह्‍,ळ्‍,क्ष्,ज्ञ्,अशी ३६व्यंजने=५२ मातृका 
v[आता ॠ,लॄ हे स्वर वापरले जात नाहीत,तसेच इंग्रजी भाषेच्या सहवासाने ऍ,ऑ असे नवीन स्वर वापरात आले आहेत.]