श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक सहावा : देवशोधन-ब्रह्मनिरुपण

च्यारि सहस्त्र सातसे साठी- आतापर्यंत कलियुगाची ४७६० वर्षे झाली असे या ४थ्या समासातील ७व्या ओवीत म्हंटले आहे. या माहितीच्या आधारे श्रीमत् दासबोधाची रचना शके १५८१ साली पूर्ण झाली ही महत्वाची गोष्ट समजते.हे नमूद करण्यासाठी जाणीवपूर्वक याच समास, ओवी व दशक क्रमांकाची निवड करुन दासबोध रचनेचा शक विशेष संकेताने श्रीसमर्थांनी अधोरेखित केला आहे. ४था समास ७वी ओवी ६वा दशक म्हणजेच = स.ओ.द= ४.७.६० वर्षे झाली, हे सांगण्यासाठी याशिवाय इतर कुठल्याच दशक, समासाची निवड करता येणं शक्य नव्हतं,यावरुन संपूर्ण दासबोध याच वर्षी पूर्ण झाला असावा असं म्हणण्यास काहीच प्रत्यवाय नाही. केवळ हे नमूद करण्यासाठीच ब्रह्मनिरुपणाचा हा दशक व समास क्रमांक निवडला आहे. अन्यथा इतरत्रही अशी नोंद श्रीसमर्थांनी केलीच असती.

No comments:

Post a Comment