श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

श्रीमद्‍ दासबोध दर्शन


श्रीसमर्थ रामदास स्वामी 
 ज्ञानविज्ञाने भरली भांडारे ।
नेणिवेपल्याड वसे तो मुरारे ।
 श्वसनी उच्छ्वास भरिला विश्वंभरे ।
 मणीय़ भासे हा सारा संसार रे ।।

पूर्वार्ध सिद्धांत - दशक


१. स्तवन                                              ६. देवशोधन

२. मूर्खलक्षणं                                        ७. चतुर्दशब्रह्मं

३. स्वगुण परीक्षा                                   ८. मायोद्भव 

४. नवविधाभक्ति                                  ९. गुणरुप  

५. मंत्रं                                                  १०. जगज्जोती


दशक पहिला - स्तवन

१.गणेश,शारदा,सद्गुरु,संत,श्रोते,कवेश्वर,सभा,परमार्थ व नरदेह यांचे स्तवन या १ल्या दशकांत केले आहे.

२.ब्रह्मज्ञान,आत्मज्ञान/ परमार्थसाधन ही जगात सर्वश्रेष्ठ असून त्याच्या प्राप्तिचा मार्ग येथे विशद केला असे.

३.जीवात्मा,शिवात्मा,परमात्मा,निर्मळात्मा हे सारे एकस्वरुप आहेत,मात्र ’निर्मळात्मा’ उपाधीरहित.

४.श्रीसमर्थ रामदासांना झालेले आत्मज्ञान- दासबोध !

५.काय, कां, कोणाकरीता व कसे लिहितो या चार कसोट्या लावून ग्रंथकाराचा थोरपणा ठरतो.

दशक दुसरा : मूर्खलक्षणं-१

१.मूर्ख लक्षण- अज्ञानी, चंचळ, अडाणी, संसारलोभी, आत्मस्तुतीप्रिय,खादाड,सप्तव्यसनी,वाचाळ,झोपाळू

२. उत्तमलक्षणसभाधीट,विनम्र,प्रेमळ,कीर्तिमान,चौकस, मीतभाषी,ऋजु,अभ्यासू,शांत,उद्योगी,मीताहारी,सत्यवादी,

३. कुविद्या लक्षण– तल्पकी,गर्विष्ठ,अहंकारी,पैशुन्यवचनी, भ्याड,मैंद,ग्राम्यवृत्ति,आळशी,उन्मत्त,लंड,तपीळ,दांभिक

४. भक्तिनिरुपण- ध्यान, योग, उपासना, ईश्वरभक्ति, ग्रंथाध्ययन,भगवद्भजन,

५. रजोगुण लक्षण-मी,माझे हेच जास्त प्रबळ,वासनायुक्त, पराभिलाषी,संसाराचीच फक्त चिंता, कृपण,मायिक,

दशक दुसरा : मूर्खलक्षणं-२

६. तमोगुण लक्षण –अत्यंत रागीट, हिंसक, वासनाग्रस्त,निद्राधीन,भ्रांत,कलहप्रिय,

७. सत्वगुण लक्षण- यजन,याजन, अध्ययन,अध्यापन,दानशूर,परोपकारी,

८. सद्विद्यानिरुपण- मृदुभाषी,भाविक,प्रेमळ,लीन,उदार,चतुर, ब्रह्मज्ञानी,विवेकी,युक्ताहारी,निर्लोभी सज्जन, सावध,उपासक,यशस्वी,सकळ क्लृप्त,

९. विरक्त लक्षण- योगी,उदासीन, विवेकी,क्षमाशील, निश्चयी, धैर्यशील,नि:स्वार्थी,एकांतप्रिय,ब्रह्मज्ञानी,सर्वज्ञ,मुक्त, 

१०. पढतमूर्ख लक्षण-साक्षर, निंदक,उद्धट,नाटकी, नास्तिक,
संस्कारहीन,दुराभिमानी. 


१.भ्रांतीचे पडदे,कुविद्येचे फळ,मृत्युचे कारण, विषयवासना,इंद्रियभोग नि ईश्वराचे विस्मरण   म्हणजे दुःख नि जन्म,

२.विषय:-विशेषेण सिंचन्ति इंद्रियाणि मनश्च-ज्याच्या ठिकाणी इंद्रिये आणि मन बुडून जातात,मग्न होतात असे पदार्थ म्हणजेच इंद्रियभोग होत,

३.दुःखाने व स्वार्थाने भरलेल्या लोभी सांसारिक माणसाची अवस्था
सर्वकाळी अशीच भ्रांत राहणार.


दशक तिसरा : स्वगुण परीक्षा-१

१.भ्रांतीचे पडदे,कुविद्येचे फळ,मृत्युचे कारण, विषयवासना,इंद्रियभोग नि ईश्वराचे विस्मरण   म्हणजे दुःख नि जन्म,

२.विषय:-विशेषेण सिंचन्ति इंद्रियाणि मनश्च-ज्याच्या ठिकाणी इंद्रिये आणि मन बुडून जातात,मग्न होतात असे पदार्थ म्हणजेच इंद्रियभोग होत,

३.दुःखाने व स्वार्थाने भरलेल्या लोभी सांसारिक माणसाची अवस्था
सर्वकाळी अशीच भ्रांत राहणार.


दशक तिसरा : स्वगुण परीक्षा-२

पाच प्रकारचे भ्रम/भ्रांति असतात.
१.जगत्सत्यत्वभ्रांती- नामरुपानी भरलेले जग सत्य वाटून ब्रह्माचा विसर पडतो. जगच खरे आहे
असा भ्रम होतो.

२. कर्तृत्वभोक्तृत्वभ्रांती- निष्क्रिय आत्म्याच्या सत्तेवर बुद्धीचे व्यवहार चालतात त्यामुळे तो आत्माच कर्ता आहे
असा भ्रम होतो. जास्वंदी-स्फटिक दृष्टांत.

३. भेदभ्रांती- आत्मबिंबाचे आभासरुप प्रतिबिंब
स्वच्छ बुद्धीत पडल्याने आत्मा व जीव
असा भेदभ्रम होतो. प्रतिबिंबवाद.


दशक तिसरा : स्वगुण परीक्षा-३

 ४.संगभ्रांती- घटाकाशाचा घटाशी कधीच
संबंध होत नसतो. घट फुटला तरी
आकाश जसेच्या तसेच असते.
 तद्वत देह मरण पावला तरी
आत्मा तसाच असतो पण
अज्ञानामुळे आत्मा मेला

 असा भ्रम होतो.
५.विकारभ्रांती- देहाला सहा विकार असतात.
अज,अमर आत्मा अविकारी असतो.
देहाचे विकार आत्म्याचे आहेत
असा भ्रम होतो.
हा भ्रम मिटतो तेव्हा
आत्मज्ञान होते.मनुष्य ब्रह्मलीन होतो.

दशक तिसरा : स्वगुणपरीक्षा-४

१. तीन ताप
  अ] आध्यात्मिक: देह, इंद्रिय, प्राण यामुळे होणारा    ताप, [खरुज,खवडे,नारु,मूळव्याध इ.]-द.३.६
  ब] आधिभौतिक: बाह्य परिस्थिती,[ठेच,सळक,किटकादि   दंश,अपघात इ.] द.३.७  
  क] आधिदैविक:शुभाशुभ कर्मामुळे होणारा ताप    [द्रव्यबळ,मनुष्यबळ,राजबळ इ.च्या जोरावर केलेली   दुष्कृत्यं,कर्मसिद्धांतानुसार होणारा यमयातनेचा ताप]  द.३.८
२. मृत्यु: सर्वश्रेष्ठ,निःपक्षपाती,जन्माबरोबर मृत्युचा   पाठलाग,मृत्युनंतर कीर्तिरुपे उरावे- द.३.९
३. संसार:- दुःखाचा महापूर, विवेके वैराग्य साधावे.

दशक चवथा : नवविधा भक्ति-१

१.श्रवण भक्ति  ----  हरिकथा,पुराण,ज्ञान, वैराग्य, उपासना ,                                                 योगमार्गादिंचे श्रवण.

२.कीर्तन भक्ति -----  भजन,सगुणहरिकथन,नृत्य,गायन,वादन

३.नामस्मरण भक्ति --  जप,सदासर्वदा स्थलकालातीत ईशस्मरण,

४.पादसेवन भक्ति --- काया वाचा मनोभावे सद्गुरुची सेवा,

५.अर्चन भक्ति ----- शास्त्रोक्त पूजाविधान, 

६.वंदन भक्ति ---- संत,साधू,सज्जन यांना नमस्कार,धर्मशाळा,देवालये                                    इ.जिर्णोद्धार, मानसपूजा, 

७.दास्य भक्ति ----- धर्मशाळा,देवालये इ.जिर्णोद्धार, मानसपूजा, 

८.सख्य भक्ति ----- परमात्म्यासच सर्व काही मानणे,अशी भक्ती

९.आत्मनिवेदन भक्ति-  सर्वश्रेष्ठ, ’अहं ब्रह्मास्मि’. 




दशक चवथा : नवविधा भक्ति-२

१.अनुभव घेत असता संगत्याग होत नाही, कारण अनुभव घ्यायचा म्हणजे अनुभव,अनुभविता,अनुभाव्य ही त्रिपुटी उत्पन्न होते. संगत्याग करताच अनुभव असा शब्द उरत नाही.अहंभाव नाही तर मग अनुभव कुठला? सारांश या गोष्टी अनुभवीच जाणतात, इतराना हा सारा गोंधळच वाटणार !

२. ’पाहणारा, पाहण्याची क्रिया, जे पाहायचे ते’ म्हणजेच ’दृष्टा,दृश्य,दर्शन’ पाहणारा जो आहे त्याच्या स्वरुपात लीन झाले की समाधान मिळणारच, सद्‍वस्तु - परब्रह्म लाभ होणारच !

दशक चवथा : नवविधाभक्ति-३

  अवस्था                       सूक्ष्म परमात्मा प्राप्तिचा सोपान

१. संगत्याग                   दृश्य,मायिक विश्वाचा संगत्याग,

२. निवेदन                  ’अहंकारत्याग” अर्थात ’मी’ चा त्याग,

३. विदेहस्थिती            ’मी देह आहे ही देहबुद्धी’ विसरणे,’अहं ब्रह्मास्मि’

४. अलिप्तता              दृश्य,मायिक विश्वाचा मिथ्यालेप सरकवणे,

५. सहजस्थिती           सुखदुःखांत सहजता,सुखदुःख समेकृत्वा,

६. उन्मनी                   मनोलय (तुर्याच्या पुढे),अनन्यता,समाधी,

७. विज्ञान                   आत्मज्ञान,नक्की/अधिक जाणणे,(अज्ञान व  
                                    ज्ञानाच्या पुढे),स्वानुभवानुभूति,अनिर्वाच्य. 



दशक चवथा : नवविधाभक्ति-४

१.आत्मस्वरुपाचे ज्ञान झाल्यावर पंचभूतात्मक देहातील तत्वें त्या आत्मतत्वातच लय पावतात.
२.’मी’ तत्वांचा साक्षी आहे म्हणजे ’मी’ तत्वा पासून भिन्न आहे,’मी’ तत्व नाही. ’सर्वं खल्विदं ब्रह्म’ अशी आत्मप्रचिती आली कीं साक्षित्वच उरत नाही. आदिअंति एकच आत्मा आहे. आपण निराळे नाहीच.
३.’तत्त्वमसि’ या महावाक्यातील त्वंपद आणि तत्पद याचा भेद असिपदाने काढून ’ते तूं आहेस’ असे ऐक्य होऊन अवशिष्ट शुद्ध परब्रह्म उरते.

दशक चवथा : नवविधाभक्ति-५

जाणीवेच्या अवस्था
  १.जागृतावस्था
       २.स्वप्न    ३.गाढ झोंप(सुषुप्ति)
                                                तुर्या(स्वप्नाचे व दृश्य विश्वाचे भान)
४. उन्मनी [सायोज्यमुक्ति]मनोलय,

’मी’ लीन होतो,ब्रह्मस्वरुपाशी तदाकार होऊन निर्विकल्प समाधी लागते. जाणीव शिल्लक राहात नाही.अनिर्वाच्य.

दशक चवथा : नवविधाभक्ति-६

१.सर्वसाक्षी अवस्था तुर्या - जा स्व सु तु या ४ अवस्था.
 जीव सर्वप्रकारचे बाह्य व्यवहार करतो ती जागृती (जा)  अवस्था,

 २.स्वप्नात फक्त मन व्यवहार करते ती स्वप्न(स्व) अवस्था,

 ३. जीवाची गाढ झोपेची सुषुप्ति(सु) अवस्था,या अवस्थेत सर्व इंद्रिये व मन यांचा अज्ञानात लय होतो.या तिन्ही अवस्था अज्ञाना पासून होतात.

 ४. तुर्या अवस्थेत जीवाला स्वस्वरुपाचे सोपाधिक ज्ञान होते.यापुढच्या“उन्मनी” स्थितीत मनाचाही लय होऊन स्वरुपज्ञान होते.निर्विकल्प समाधी लागते.(द५.९.२६/२७)

 ५. पहावे आपणासी आपण-विपश्यना . 

दशक पाचवा : मंत्रं-१

१.अनुहातध्वनी- अनाहत ध्वनी, प्राण्यांच्या देहात हे १० प्रकारचे ध्वनी सतत चालू असतात.आघाताने उत्पन्न होतात,ते आहतध्वनी होत.
२.अष्टांगयोग- योग=चित्तवृत्ती निरोध.यमनियमादि आठ अंगे,”यनिआप्राप्रधाध्यास” ही होत.
३. चक्रे- गुदद्वारापासून ब्रह्मरंध्रापर्यंतची मूलाधारादि “मूस्वामअविआस” ही ७ चक्रे.
४. महावाक्ये- प्रज्ञानं ब्रह्म, अहं ब्रह्मास्मि, तत्त्वमसि, अयमात्माब्रह्म ही ४ वेदांतील महावाक्ये असून त्यांचा जप करावा असं सांगतात. पण ते योग्य नाही.द५.६.११ ५. पवित्र उत्तम- ब्रह्मज्ञानासारखे दुसरे काही पवित्र नसते.

दशक पाचवा : मंत्रं-२

१. गुरुनिश्चय         मिथ्या दृश्यविश्वाचा भ्रम तोडण्यास  सद्गुरुच हवा . 

२. गुरुलक्षण         अज्ञानचा अंधकार नाहिसा करतो,पैलपार नेतो,

३. शिष्यलक्षण      सात्विक,प्रज्ञावंत,नीतिवंत,गुरुला सर्वश्रेष्ठ मानतो,

४. उपदेशलक्षण   फक्त आत्मज्ञानाचा वा परब्रह्मप्राप्तिचा मंत्र,

५. बहुधाज्ञान        आत्मज्ञान म्हणजेच खरे ज्ञान,

६. शुद्धज्ञान निरुपण    तेच आत्मज्ञान,खरा ’मी’ तो आत्मा,तेच ’ब्रह्म’ ह्या ज्ञानाने तुर्या अवस्थेच्या पुढे जाऊन ’उन्मनी’ अवस्था प्राप्त होणे अर्थात’ब्रह्मलीन’होणे.