श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक एकोणिसावा : शिकवण

राजकारणात बुद्धिमान व चतुर माणूस असावा. त्याने सहसा चूक होऊ देऊ नये,कारण त्याचा परिणाम पुष्कळांना भोगावा लागतो.

उत्कृष्ट व भव्य असेल तेच स्वीकारुन, हलक्या गोष्टींचा त्याग करावा आणि निस्पृहपणे जगात प्रसिद्ध व्हावे.


राजकारण व समाजकारण चंचलात वावरतात, उपाधीस बाजूस सारून परब्रह्म साधावे.


उपासनेसाठी ठावठिकाणा काळवेळेचं बंधन नसते. महंताने लोकसमूहास नित्यनेम व उपासनेत गुंतवून ठेवावे,म्हणजे लबाडी सूचत नाही.


No comments:

Post a Comment